उद्धव ठाकरे यांचा झंझावात मराठवाड्यात, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आज जन संवाद

कोकणानंतर आता मराठवाडय़ात भगवे तुफान येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात झंझावाती ‘जन संवाद’ दौरा करणार असून या दौऱयामुळे शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनतेत चैतन्य पसरले आहे.

महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारचे अक्षरशः जंगलराज सुरू आहे. मिंधे आणि भाजपच्या गुंडगिरीविरोधात जनमानसात प्रचंड चीड आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या कारभाराची चिरफाड करण्यासाठी उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात जात आहेत. कल्याण, रायगड, सिंधुदुर्ग-रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांचा नुकताच झंझावाती दौरा झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे उद्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ‘जन संवाद’ दौरा करणार आहेत. गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर शहर येथे ते जनतेशी संवाद साधणार आहेत.

असा आहे दौरा
गंगापूर
दुपारी 12.30 वा.
वैजापूर
दुपारी 3 वा.
कन्नड
संध्याकाळी 5.15 वा.
छत्रपती संभाजीनगर शहर
संध्याकाळी 7.30 वा.