उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी आज ऑनलाइन संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

23 जानेवारी म्हणजे हिंदुत्वाचे मेरूमणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या दैनिक ‘सामना’चा वर्धापन दिन. शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिक हे नाते अतूट आहे. कोरोनाच्या कठीण काळामुळे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले अनेक दिवस शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता आला नाही. 23 जानेवारीच्या निमित्ताने तो घडणार आहे.

उद्धव ठाकरे यांचा ‘झूम’ ऍपवरून होणारा हा ऑनलाइन संवाद देशभरातील शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि शिवसेनाप्रमुखांवर जीवापाड प्रेम करणारे कोटय़वधी लोक यूटय़ूब, फेसबुक, ट्विटरद्वारे अनुभवू शकणार आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

वेळ – रात्री 8

माध्यम – झूम ऍप

याद्वारेही संवादात सहभागी व्हा!

यूटय़ूबवर http://youtu.be/A12rMTfpZeM

shivsena फेसबुक पेज

@shivsena व @shivsenacommunications ट्विटर पेज