
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांना आज गुरुवारी शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ११ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्षांसह शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती नमूद आहे.


























































