
अमेरिकेच्या संरक्षण दलाचे मुख्यालय असलेल्या Pentagon पेंटागॉनने 3 व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. अवकाशात उडणाऱ्या अकल्पनीय गोष्टींचे हे व्हिडीओ असलून या उडत्या तबकड्या किंवा परग्रहवासीयांची विमाने असल्याचा दावा केला जात आहे. आजवर अनेकांनी आपल्याला उडत्या तबकड्या दिसल्याचा दावा केला आहे. काहींनी तर असाही दावा केला आहे की आपले परग्रहववासीयांनी अपहरण केले होते आणि अनन्वित छळ केला.
हे वाचलंत का? उडत्या तबकड्या: वास्तव की रहस्य?
हे वाचलंत का? जगप्रसिद्ध गायकाचा UFO पाहिल्याचा दावा
असे दावे करणाऱ्यांची संख्या ही युरोपिअन देशांमध्ये अधिक आहे. या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हिडीओंमुळे परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
2004 आणि 2015 साली नौदलाच्या सरावादरम्यान हे व्हिडीओ टीपण्यात आले होते. हे व्हिडीओ आधीच काही माध्यमांनी दाखवले होते, मात्र ते खरे आहेत का खोटे याबाबत संदीग्धता होती. पेंटागॉनने आता हे व्हिडीओ स्वत:च प्रसिद्ध केल्याने पूर्वी लीक झालेले आणि माध्यमांनी दाखवलेले व्हिडीओ खरे असल्याचं सिद्ध झालं आहे.
हे वाचलंत का?- एलियन्स नक्की आहेत का?
अमेरिकेने पृथ्वीला भेडसावणाऱ्या यूएफओ म्हणजेच उडत्या तबकड्यांच्या शोधासाठी लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सुरक्षा यंत्रणा पेंटॅगॉनने 2007 ते 2012 या पाच वर्षांच्या कालावधीत यूएफओंच्या संशोधनासाठी लाखो डॉलर्सचा खर्च केला आहे.
अमेरिकन वृत्तसंस्था न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, 2007 मध्ये अतिवेगवान विमानं आणि अवकाशात दिसणाऱ्या विचित्र वस्तू यांच्यावर संशोधन करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. ‘अॅडवान्स्ड एरोस्पेस थ्रेट आयडेंटिफिकेशन’ असं नाव असलेला हा कार्यक्रम हॅरी रीड नावाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका निवृत्त सिनेटरने सुरू केला होता. संशोधकांना असा संशय होता की, अवकाशात उडणाऱ्या वस्तू या परग्रहवासीयांशी निगडीत असू शकतात किंवा परग्रहावरही जीवसृष्टी असल्याचे पुरावे असू शकतात. त्यामुळे 2012 पर्यंत हा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला होता.
I’m glad the Pentagon is finally releasing this footage, but it only scratches the surface of research and materials available. The U.S. needs to take a serious, scientific look at this and any potential national security implications. The American people deserve to be informed. https://t.co/1XNduvmP0u
— Senator Harry Reid (@SenatorReid) April 27, 2020
>हॅरी रीड यांच्या म्हणण्यानुसार, त्या पाच वर्षांमध्ये अमेरिकेने तब्बल 20 मिलिअन डॉलर्स (१ अब्ज 28 कोटी रुपये) इतका खर्च केला होता. मात्र, 2012 नंतर कार्यक्रमाचा निधी बंद झाल्यामुळे हा शोध थांबवण्यात आला. अमेरिकन राजकारण आणि समाजकारणाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी मात्र कार्यक्रम थांबल्याविषयी शंका व्यक्त केली आहे. कार्यक्रम थांबवण्यात आला असला तरीही हा शोध थांबवला गेला नव्हता. तसंच, या शोधाच्या माध्यमातून अमेरिका इतर राष्ट्रांच्या तांत्रिक प्रगतीवरही नजर ठेवत असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.




























































