…तर पॅनकार्ड निक्रिय होईल, 31 डिसेंबरपर्यंत पॅन-आधार लिंक आवश्यक

केंद्र सरकारने पॅनकार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली आहे. यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की, सर्व करदात्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपले पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर ही डेडलाईन चुकली, तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅनकार्ड निक्रिय होईल.  कार्ड निक्रिय झाल्यास कर भरणे, बँकेची महत्त्वाची कामे आणि इतर आर्थिक व्यवहार करणे अत्यंत कठीण होणार आहेत.

पॅनआधारकार्ड कसे लिंक करावे?

आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जा ः https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/  अशी ही वेबसाईट आहे.  होमपेजवर दिसणाऱ्या ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक आणि 12 अंकी आधार क्रमांक टाका. सूचनांचे अनुसरन करून आवश्यक शुल्क (असल्यास) भरा आणि फॉर्म सबमिट करा. सिस्टम अर्ज आपोआप लिंक करेल आणि तुम्हाला कन्फर्मेशन देईल. त्याच पोर्टलवर ‘लिंक आधार स्टेटस’वर क्लिक करून पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यास तुमचे कार्ड लिंक झाले आहे की नाही पहा.

आधार-पॅन लिंक करण्याची मुदत याआधी अनेकदा वाढवण्यात आलेली आहे. आता नवीन डेडलाईन 31 डिसेंबर 2025 आहे.  यानंतर आधार-पॅन लिंकला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. जर 31 डिसेंबरपर्यंत आधार-पॅन लिंक केले नाही, तर 1 जानेवारी 2026 पासून पॅनकार्ड निक्रिय होईल. पॅनकार्ड निक्रिय झाले तर आयटीआर भरताना अडचणी येतील, टॅक्स रिफंड होणार नाही. टीडीएस/टीसीएस संदर्भातही अडचणी उद्भवतील.