एकाच विमानातील 7 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, या वयोगटातील प्रवाशांनी पाळले नाही नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uk-flight

ब्रिटनमध्ये एका विमानातून प्रवास करणारे सात जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना विलगिकरण कक्षात राहण्यास सांगितले आहे.

एक विमान ग्रीसवरून ब्रिटनमध्ये येत होते. यामध्ये सुट्ट्यांसाठी ग्रीसमध्ये गेलेल्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. 25 ऑगस्ट रोजी विमान ब्रिटनमध्ये पोहोचले.

ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी माहिती जाहीर केली. यावेळी या विमानातील 7 प्रवासी संक्रमित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे तीन वेगवेगळ्या ग्रुप मधील होते.

अधिकाऱ्यांनी माहिती जारी करताना सांगितले की, या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी परिस्थितीचे भान राखत स्वत:हून विलगिकरणात जावे. तसेच कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. याशिवाय प्रत्येक प्रवाशासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वय वर्ष 20 ते 30 असलेल्या व्यक्तींनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने अन्य गटातील लोकांना देखील कोरोनाची लागण झाली.