कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वाढतच चालला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर युनायटेड किंगडम सरकारने त्यांच्या नागरिकांसाठी एक मोठे आवाहन केले आहे. ‘ज्या नागरिकांची प्रतिकारकक्षमता कमी आहे. जे आजारी आहेत. ट्रान्सप्लांट सारख्या मोठ्या शस्त्रक्रीया झाल्या आहेत अशा नागरिकांनी पुढिल तीन महिने तरी घराबाहेर पडू नका’, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
कर्करोग, क्षयरोग, ट्यूमर सारखे आजार, ट्रान्सप्लांट सारख्या शस्त्रक्रीया झाल्यामुळे ज्यांची प्रतिकारक क्षमता कमी झाली आहे. त्या नागरिकांना या व्हायरसची बाधा लगेच होऊ शकते. युकेमध्ये सध्या अशी तेरा लाख लोकं आहेत. त्यांनी पुढिल तीन महिने तरी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे पुढिल तीन महिने त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन युके सरकारकडून करण्यात आले आहे. युनायटेड किंगडममध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 233 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच हजारहून अधिक जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.



























































