
युद्धबंदीची चर्चा हवेत विरल्यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले असून आज दोन प्रवासी रेल्वे गाडय़ांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर लागलेल्या आगीत 30 हून अधिक नागरिक जखमी झाले. त्यात प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱयांचाही समावेश आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्वतः ही माहिती दिली. त्यानुसार रशियाच्या सीमेपासून 70 किलोमीटरवर असलेल्या युक्रेनच्या नॉर्दन सुमी प्रांतात ड्रोन हल्ले करण्यात आले. रशिया जाणीवपूर्वक नागरी ठिकाणांना लक्ष्य करत आहे, असा आरोप त्यांनी केला.