Ulhasnagar Firing – महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक

उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले होते. महेश गायकवाड यांच्यावर काही शस्त्रक्रीया करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

महेश गायकवाड यांच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शंभूराज देसाई यांनी रविवारी दुपारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे.