
सामना प्रतिनिधी । उल्हासनगर
डंपिंगच्या दुर्गंधीने आधीच उल्हासनगरवासीय हैराण झाले असताना गेल्या दहा दिवसांपासून येथे सतत छोट्या-मोठ्या आगी लागण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे डंपिंगला आग लागत असल्याने धुराचे लोट सर्वत्र पसरले असून रहिवाशांना श्वास घेणेही मुश्कील झाले आहे. ऐन दिवाळीत ही नरकयातना नशिबी आल्यामुळे उल्हासनगरवासीय पुरते हवालदिल झाले असून यातून सुटका कधी होणार, असा सकाल उपस्थित केला जात आहे.
कॅम्प नंबर 2 परिसरात म्हारळ गावाजकळील डंपिंग ओव्हरफ्लो झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून कॅम्प नंबर 5 येथील खदान भागात दुसरे डंपिंग ग्राऊंड तयार केले आहे. येथे वसाहती आणि दोन शाळादेखील असल्याने दररोज डंपिंगमधून येणाऱ्या महाभयंकर उग्र वासामुळे विद्यार्थी व रहिवाशांना श्वास घेणे मुश्कील झाले आहे. त्यातच दिकाळी सुरू झाल्यापासून कॅम्प नंबर 5 मध्ये खदानीतील डंपिंग सातत्याने पेटत आहे. दिवाळीच्या पूर्वीदेखील डंपिंगमधून धूर येत होता. आता मात्र सलग डंपिंग पेटत असून त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. त्यामुळे सणासुदीला पाहुण्यांनासुद्धा बोलावता येत नसून अनेकांनी तर आपल्या मुलांना नातेवाईकांकडे धाडले आहे.
जिंदगी बन गयी धुआँ…
ऐन दिकाळीत पेटत्या डंपिंगच्या दुर्गंधीने नरकयातना भोगणाऱ्या रहिवाशांनी शहरात डंपिंग हटावचे पोस्टर्स झळकवले आहेत. ‘कायद्याने वागा लोकचळवळ’च्या पुढाकाराने हे पोस्टर्स झळकण्यात आले असून पालिकेने डंपिंगच्या बंदबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर कचरागाड्या रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.




























































