INDvAus : सुमार गोलंदाजी करणाऱ्या उमेश यादवला नेटकऱ्यांनी धुतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । विशाखपट्टनम 

विशाखापट्टनम येथे रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत घासून झालेल्या या सामन्यात तीन विकेटने विजय मिळवत १-० ने आघाडी घेतली. शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. कर्णधार विराट कोहलीने विदर्भ एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्य़ा आणि बऱ्याच कालावधीनंतर टी-२० मध्ये कमबॅक करणाऱ्या उमेश यादवकडे चेंडू सोपवला. परंतू उमेशने सुमार गोलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी हिंदुस्थानचा पराभव केला. या पराभवानंतर नेटिझन्सनी उमेश यादववर टीकेची झोड उठवली आहे.