धक्कादायक! धोनी आऊट झाला तो होता नो बॉल, नेटकऱ्यांनी अंपायरला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव करत फायनलमध्ये धडक घेतली आहे. मात्र या सामन्यात चुकीच्या अंपायरींगचा फटका टीम इंडियाला बसल्याचे समोर आले आहे. महेंद्र सिंह धोनी बाद झाला तो बॉल मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला व सामना न्यूझींलंडने जिंकला. मात्र धोनीला बाद करणारा तो बॉल नो बॉल होता असा दावा काही नेटकऱ्यांनी केला असून त्यावरून अंपायरला फटकारण्यात येत आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार तिसऱ्या पॉवर प्लेमध्ये तीस यार्डाबाहेर पाचच्या वर खेळाडू असता कामा नये. मात्र सोशल मीडियावर धोनी ज्या बॉलवर बाद झाला त्या बॉलच्या वेळी न्यूझीलंडची जी फिल्डींग होती त्याचे ग्राफिक व्हायरल झाले आहे. त्या ग्राफिकमध्ये वर्तुळाबाहेर त्या ओव्हरच्या वेळी तीस यार्डाबाहेर सहा खेळाडू होते. तसे असेल तर तो बॉल अंपायर नो बॉल ठरवतात. मात्र धोनी खेळत असताना तीस यार्डाबाहेर सहा खेळाडू होते याकडे मैदानावर असलेल्या दोन्ही अंपायरचे लक्ष नव्हते. त्यावरून नेटकऱ्यांनी अंपायरला फटकारले आहे. नो बॉल असला तरी धावबाद दिला जातोच. मात्र बॉल टाकता क्षणीच नो बॉल दिला असता तर कदाचित धोनीने ती धाव घेतली नसती असा तर्क दिला जात आहे.