लातूर बसस्थानकात आढळला बेवारस मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बेवारस अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील बाकावर एक व्यक्ती खूप वेळ झोपलेली होती. बस बंद असल्याकारणाने बसस्थानकात तूरळक माणसे होती. कोणीतरी झोपलेला असेल म्हणून त्याच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नव्हते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मृतदेहाचा वास सर्वत्र पसरु लागल्यामुळे ही गोष्ट लक्षात आली. तातडीने याची माहीती पोलिसांना देण्यात आली. मृताची ओळख पटलेली नव्हती.