Under 19 WC – टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेचा 90 धावांनी धुव्वा

789

चार वेळची चॅम्पियन हिंदुस्थानने अंडर-19 वर्ल्ड कपची सुरुवात विजयाने केली आहे्. हिंदुस्थानच्या तरुण खेळाडूंनी पहिल्याच लढतीत श्रीलंकेचा 90 धावांनी पराभव केला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सिद्धेश वीर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये रविवारी टीम इंडिया आणि श्रीलंकेत सामना झाला. या लढतीत टीम इंडियाने प्रथम प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 विकेट्स गमावून 297 धावा केल्या. टीम इंडियाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 59 धावा चोपल्या. कर्णधार प्रियम गर्गने 56 आणि ध्रुव जुरेल याने 52 धावा काढत त्याला चांगली साथ दिली. तिलक वर्मा याने 46 आणि सिद्धेश वीर याने 44 धावांचे योगदान दिले.

टीम इंडियाने दिलेल्या 298 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. फलंदाजीमध्ये दमदाम कामगिरी करणाऱ्या सिद्धेश वीर याने गोलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करत 2 बळी घेतले. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 45.2 षटकात 207 धावांमध्ये बाद झाला आणि टीम इंडियाने 90 धावांनी सामना जिंकला.

पाचव्या विजेतेपदासाठी झुंज
अंडर -19 चा हा 13 वा वर्ल्डकप असून टीम इंडियाने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा हा कप जिंकला आहे. टीम इंडियाने 2000, 2008, 2012 आणि 2018 ला या वर्ल्डकपवर विजयी मोहर उमटवली आहे. टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाने 3 पाकिस्तानने 2 आणि इंग्लंड वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी 1 वेळा अंडर -19 चे विजेतेपद पटकावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या