गतविजेता हिंदुस्थान सलामीला श्रीलंकेला भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी वर्षी जानेवारीत होणार्‍या युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या या स्पर्धेत 16 संघांचा सहभाग असून या संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्यातील लढतीने 17 जानेवारी 2020 रोजी या स्पर्धेला प्रारंभ होईल, तर 9 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळविला जाणार आहे. गतविजेत्या हिंदुस्थानसमोर सलामीला श्रीलंकेचे आव्हान असणार आहे.

हिंदुस्थान व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना वेगवेगळ्या गटांत ठेवण्यात आले असून ‘आयसीसी’च्या स्पर्धेत पदार्पण करत असलेल्या जपानला सलामीलाच न्यूझीलंडचे आव्हान असेल.