केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नांदेड दौरा तांत्रिक कारणांमुळे रद्द

amit-shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी नांदेड दौऱ्यावर येणार होते. मात्र हा दौरा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

शिखांचे नववे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त आयोजित हिंद-दी-चादर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमित शहा नांदेडला येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. तांत्रिक कारणांमुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

Photo – हिंद-दी-चादर! गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नांदेडमध्ये भव्य नगर कीर्तन सोहळा