
ऑनलाईन फूड ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी बॉय सायकल किंवा बाईकवरून ऑर्डर घेऊन येत असल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. सध्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीमधील एक फूड डिलिव्हरी बॉय त्याच्या अनोख्या अंदाजामुळे चर्चेत आला आहे. कारण हा बॉय फूड डिलिव्हरीसाठी बाईक किंवा सायकलवरून नाही तर चक्क स्केटिंग करतच फूड डिलिव्हरी करतोय. काहींनी पेट्रोलचे दर वाढल्याने डिलिव्हरी बॉयने नामी शक्कल लढवल्याचे म्हटले आहे.
























































