चिरंजीवी वृक्ष

1560

>> संजीवनी धुरी-जाधव

झाडं हिरवीगार, टवटवीत राहण्यासाठी काय लागतं…? पाणी. काही न काही कारणाने पाण्याच्या अभावाने झाडं सुकून जातात. डॉ. मिलिंद देशपांडे यांच्या एका उपयुक्त उत्पादनाविषयी सविस्तर…

झाडांना एक दिवस पाणी घातले नाही तर झाड कोमेजून जाते. मग आठ दिवस झाडांना पाणी घातलं नाही तर त्याची अवस्था काय होईल याचा अंदाज आपल्या सगळ्यांनाच आहे. पुढे पुढे जर पाण्याची अवस्था बिकट होत जाणार आहे अशावेळी आपल्यालाच पाणी मिळणार नाही तर झाडांना कुठून देणार…? या प्रश्नाचा आपले फसलेले पाण्याचे नियोजन, पर्यावरणाचा वेगाने होणारा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंगची आपल्या दारावर येऊन ठेपलेली प्रचंड संकटे व या सगळ्यावर मात करण्यासाठी डॉ. मिलिंद देशपांडे यांनी एका पर्यावरणपूरक उत्पादनाची निर्मिती केली आहे, यामुळे पाण्याची बचत, नियोजन आणि ओल्या-सुक्या दुष्काळावर फायदा होईल असा त्यांचा विश्वास आहे.

डॉ. मिलिंद देशपांडे हे वेलमर्झ या कंपनीचे निर्माते आहेत. आपल्या लोकांना उपयोगी पडतील अशा वस्तूंची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच्या ते सातत्याने मागे असतात. नुकताच त्यांनी MURCZ ESAP या अनोख्या पर्यावरणपूरक उत्पादनाची निर्मिती केली आहे, ज्याने झाडांना बरेच दिकस पाणी न घालता झाडे टकटकीत राहायला मदत होणार आहे. हे जास्त मेहनतीचे काम नसून त्यासाठी 2 ग्रॅम ब्राऊनिश रंगाची ही पावडर घेऊन कुंडीतील माती खोदून त्यात घालायची आणि आठ – दहा दिकस निवांत राहायचे. त्यानंतर परत पाणी घालायचे. या उत्पादनाबाबत त्यांना विचारले असता ते सांगतात की, या उत्पादनात काही शेपट पाणी शोषून घेण्याची क्षमता आहे. एक ग्रॅम हे उत्पादन घेतलं तर ते तीनशे-चारशे मिली पाणी त्यात टिकवून ठेकता येतं. घरगुती झाडे, बागांमध्ये आम्ही हे उत्पादन वापरायला सुरुवात केली आहे असेही ते सांगतात. पुढे ते सांगतात की, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे, बाग, उसाची शेती वगैरेना भरपूर पाणी लागतं. या झाडांच्या मुळाशी मातीचा वरचा थर काढून हे उत्पादन घातले तर झाडांना आठ दिवस पाणी घालण्याची गरज नाही. गेले सात-आठ महिने मी आमच्या घरात हे उत्पादन वापरल्याचे डॉ.देशपांडे सांगतात.

उत्पादनाचे वैशिष्टय़ाबाबत बोलताना डॉ. देशपांडे सांगतात की याचा व्यापक दृष्टिकोनातून किचार केला पाहिजे… आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरचा बर्फ वितळायला लागला आहे व त्यामुळे समुद्राची पातळी धोकादायकरीत्या काढत आहे. हे वेळीच रोखले नाही तर येणाऱ्या काळात सगळी शहरे पाण्याखाली जातील…! बेसुमार जंगलतोड, वाढती लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. याकर उपाय म्हणजे खूप मोठय़ा प्रमाणावर झाडे लावणे व ती जगवणे, आहे ती झाडे टिकवणे. यासाठी पाणी आवश्यक आहे. MURCZ ESAP चे महत्त्व असे व्यापक आहे. आपण तयार केलेले उत्पादन हे पर्यावरणपूरक आहे, या उत्पादनाचे मी पेटण्ट घेणार असल्याचेही डॉ. देशपांडे सांगतात.

पाऊस जास्त पडल्यावर शेतात पाणी शिरते अशावेळी शेताभोवती मोठय़ा कॉटन बॅगेत हे उत्पादन भरून ठेकले तर जोरात वाहत येणारे पाणी हे उत्पादन शोषून घेते आणि शेताचे नुकसान होण्यापासून वाचवते. त्याचबरोबर पाणीटंचाईकर मात करण्यासाठीही या उत्पादनाचा उपयोग होऊ शकतो. गावात पाणीटंचाई असेल पण अधेमधे पाऊस पडत असेल मग गावात मोठा खड्डा करून आतून प्लॅस्टिक घालायचे 1 टन उत्पादन त्यात घातले तर पाऊस पडल्यावर हे उत्पादन तीन ते पाच लाख लीटर पाणी शोषून ठेवलं जातं आणि जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हा वेलमार्क कंपनीने तयार केलेले दुसरे उत्पादन त्यावर शिंपडायचे त्यावेळी शोषून घेतलेले पाणी पटकन मोकळे होते. ते उत्पादन खाली राहते आणि पाणी वर येते. हे पाणी वरच्या वर काढून वापरता येते. हे उत्पादन अनेक बाबतीत स्वयंरोजगार निर्मिती करणारे ठरेल. शासनाने या उत्पादनाची दखल घेतल्यास भविष्यात अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठे योगदान ठरेल असा विश्वास डॉ. मिलिंद देशपांडे यांनी व्यक्त केला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या