एका लग्नाची अनोखी गोष्ट, मुलीच्या लग्नात माणसांबरोबर प्राणी, पक्षी आणि मुंग्यानाही दिली दावत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

बुलढाणा जिल्ह्यातील एक अनोखा लग्नसोहळा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लग्नात माणसांबरोबरच प्राणी, पक्षी, मुंग्यांनाही जेवणाची दावत देण्यात आली होती. या लग्नात सहभागी होण्यासाठी पाच गावांना आमंत्रण देण्यात आले होते. जवळपास 10 हजार लोकं या लग्नात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आपल्या मुलीच्या लग्नात एवढी मोठी दावत देणारा माणूस हा कोणी जमिनदार किंवा उद्योहपती नव्हे तर एक साधारण शेतकरी आहे.

मीडिया वृत्तानुसार, आपल्या मुलीच्या लग्नात प्राणी, पक्षी, मुंग्या यांना दावत देणारा शेतकऱ्याचे नाव प्रकाश सरोदे आहे. ते बुलढाणा येथील मोताला तहसीलयेथील कोथली गावातील रहिवासी आहेत. त्यानी आपल्या मुलीचे लग्न अतुल दीवाने नावाच्या तरुणाशी ठरवले होते. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी अनेक आठवड्यांपासून सुरू होती. लोकांना जेवणासाठी मोठा मंडप घातला होता. सोबत लग्नाच्या विधींसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला होता. तो थाटमाट पाहून ते लग्न एका शेतकऱ्याच्या मुलीचे नव्हे तर उद्योगपतीच्या मुलीचे वाटत होते. लग्नासाठी संपूर्ण गावात सजावट करण्यात आली होती.

प्रकाश सरोदे यांच्या एकुलत्या मुलीच्या लग्नासाठी गावात पाच ऐकर जागेत मंडप बनवला होता. तिच्या लग्नात 10 हजार लोकं जेवले. सोबत गाय, मुंग्या आणि पक्ष्यांनाही दावत देण्यात आली होती. गुरांसाठी 10 ट्रॉली सुखा चारा ठेवण्यात आला होता, तर गायींसाठी 10 क्विंटल कोंड्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुंग्यासाठी दोन गोण्या साखर, पक्ष्यांसाठी अनेक गोण्या तांदूळ , कुत्र्यांसाठी वेगळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांनी लग्नाच्या दिवशी गावातील कुठलीच व्यक्ती, प्राणी, पक्षी, मुंग्या उपाशी राहू नये. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सरोदे यांचा जावई अतुल दिवाने हिंदुस्थानी सैन्यात नोकरीला आहे. सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तिच्या लग्नासाठी जमवाजमव सुरू केली होती. या लग्नसोहळ्यासाठी त्यांना 30 ते 35 लाखांचा खर्च झाला.