रेकॉर्ड! 110 लिटरचे रक्तदान

‘रक्तदान हे जीवनदान आहे’ या वचनाला जागत अमेरिकेतील हेन्री बिकॉफ या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने रक्तदान करून 693 जणांना जीवनदान दिलंय. हेन्री बिकॉफ यांनी आतापर्यंत 29 गॅलन म्हणजे साधारण 110 लिटर रक्त दान केलंय. मागील 49 वर्षांपासून हेन्री बिकॉफ रक्तदान करत आहेत. दर 56 दिवसांनी ते ब्लड डोनेट करतात. याला ते मल्टिटास्किंग काम समजतात. रक्तदान करून छान वाटतं. खूप वर्षांपासून हे कार्य करतोय. आता तर हे माझं दैनिक कार्य झालंय. असं केल्याने एक चांगली ओळख मिळतेय, असे हेन्री बिकॉफ म्हणाले. पहिल्यांदा रक्तदान केलं तेव्हा ते कॉलेजमध्ये होते, अशी आठवण हेन्री यांनी सांगितली.