
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी स्टेडियम ते रत्नागिरी जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आवार पर्यत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
एकता दौडमध्ये अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पालीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बामणे, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत, नायब तहसिलदार श्री. दांडेकर आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शाळा, पोलीस, महाविद्यालयीन विद्यार्थी सहभाग घेतला.याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी बाबासाहेबत बेलदार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारीत चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.































































