अज्ञात व्यक्तीने हरभराची बनीम पेटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। औराद शहाजानी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या भालकी तालुक्यातील तुगाव (हा.) येथील शेतकरी व्यंकटराव तुळशीराम लखनगावे यांची अडीच एकर जमीन मांजरा नदीच्या काठावर असून त्या जमिनीवर रब्बी हंगामातील हरभरा पिक घेण्यात आले होते. पण अज्ञात व्यक्तीने हा हरभरा पेटवून बनिम भस्म केली.

या शेतकऱ्याने रोजंदारीच्या बदल्यात शेजाऱ्याच्या विहिरीतील पाणी देऊन हरभरा पिक घेतलं होतं. लखनगावे गुरुवारी हरभरा बनिम लावून ताडपत्री झाकून घरी गेले. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हरभरा बनिमलाच आग लावली. यात सगळा हरभरा जळून खाक झाला. नदीच्या काठावर जमीन असल्याने दरवर्षी पुराच्या तडाख्यात सापडणाऱ्या शेतकऱ्यास खरीप हंगामातील पिकाबरोबर रब्बी हंगामातील हरभरा पिक हाता-तोंडाशी आले असता पिक उत्पादनास मुकावे लागले आहे.