बीडमध्ये पोत्यात आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

गुरूवारी रात्री काही अज्ञातांनी 48 वर्षीय एका व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राचा घाव घालून खुन केला आहे. त्याचा मृतदेह पोत्यात बांधुन जामखेडकडे जाणार्‍या आरोळे वस्ती जवळ रस्त्यालगत फेकून दिल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील खडकत गावाच्या परिसरात आज अंदाजे 48 वर्षीय इसमाचा खुन करुन पोत्यात बांधलेल प्रेत खडकत -जामखेड रस्त्यावरील आरोळे वस्ती जवळ आज शुक्रवारी सकाळी आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात  अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापडलेले प्रेत हे अंबाजोगाई येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे.

खिशात सापडली चिठ्ठी… 

सदरील मृत व्यक्तीच्या खिशात एका अर्धवट छोटी फाटलेली चिठ्ठी सापडली आहे. यात पुणे जिल्ह्यातील कोतवाल या गुर्‍हाळ  चालवणार्‍याचे नाव असुन तीन मोबाईल क्रमांक लिहीलेले आढळुन आले आहेत. याची तपासणी पोलीस करत आहेत. मृत व्यक्तीचे मंच्छिद्र नाव असल्याचे कळाले. सदर व्यक्ती नगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.