चीनमध्ये गर्भनिरोधक उत्पादनांवर 13 टक्के टॅक्स

चीनमध्ये जन्मदरात मोठी घसरण झाली आहे. जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. वन चाईल्ड पॉलिसीला 2015 ला संपवून 2021 मध्ये कमीत कमी 3 मुलांना जन्माला घालावे असे निर्देश सरकारने दिले होते. आता पुन्हा एकदा सरकारने जन्मदर वाढवण्यासाठी गर्भनिरोधक औषधांवर 13 टक्के इतका मोठा टॅक्स लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी येत्या 1 जानेवारीपासून केली जाणार आहे. या टॅक्सचा परिणाम किती होईल यावरून सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत.