
इस्लामाबाद Š मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने मंजुरी दिली आहे. लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुखदेखील आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंजुरी समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखवीला देण्यात येणाऱया प्रती महिना दीड लाखांमध्ये जेवण (50 हजार), औषधे (45 हजार), सार्वजनिक गोष्टींचा वापर (20 हजार), वकिलांची फी (20 हजार) आणि वाहतूक (15 हजार) यांचा समावेश आहे.मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर लखवीचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत करण्यात आला होता. 2015 पासून तो जामिनावर बाहेर आहे.


























































