बंगळूरुत अवकाळी पावसाचा हाहाःकार, ऐन उन्हाळ्यात रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप

कर्नाटकची राजधानी बंगळूरुत रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बंगळूरुत अनेक ठिकाणी पाणी भरलं. ऐन उन्हाळ्यात शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आले आहे.

हवामान विभागाच्या बंगळूरु केंद्राने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मंगळवारी शहराला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी बंगळूरुत इतका पाऊस झाला की शहरातं सगळीकडे पाणी भरलं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. अनेक ठिकाणी पाणी भरल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बंगळूरुतील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. काही भागात वीज जाऊ शकते, तसेच वादळी वाराही वाहू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.