शेवगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने पुन्हा एक वार हजेरी लावली यंदाच्या पावसाळ्यात पावसाअभावी आधीच दुष्काळी परिस्थितीच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना सततच्या अवकाळी पावसामुळे आणखी बेजार केले आहे. तालुक्यातील सर्वच्या सर्व सहा मंडळात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसह खरिपाच्याही विविध पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली तालुक्यातील भातकुडगाव मंडळात तर अतिवृष्टीची नोंद झाली. लागोपाठ झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा तूर कपाशी आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला तर काही ठिकाणी काढणीला आलेल्या कापूस तुर कांदा डाळिंब टोमॅटो लिंबू आदि पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात रविवारी व त्या पाठोपाठ बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनास दिल्या त्यानुसार कामगार तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिले आहे. तालुक्यात आज गुरुवारी सकाळी संपलेल्या 24 तासात मंडल निहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे चापडगाव 24 मिमी एरंडगाव 20 बोधेगाव19 शेवगाव 16 ढोरजळगाव 10 मिमी. भातकुडगाव मंडळातील पावसाची आकडेवारी उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.