
आपल्या विचित्र फॅशनने कायम चर्चेत असणारी सेलिब्रिटी म्हणजे उर्फी जावेद. तिच्या हटके आणि तितक्याच विचित्र स्टाईलने ती नेहमी लोकांचं लक्ष वेधून तर घेते, पण कधी कधी ट्रोल होते आणि वादी ओढवून घेते. अर्थात ती या टीकेकडे सपशेल दुर्लक्ष करून नित्य नवीन विचित्र फॅशन करत राहणं पसंत करते. पण, आता ती माधुरी दीक्षित आणि एका कार्यक्रमाच्या आयोजकांवर चिडली आहे.
उर्फी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यातल्या घटना शेअर करते. त्यात ती तिला योग्य वाटणाऱ्या गोष्टींचं समर्थन करते किंवा तिला खटकणाऱ्या गोष्टींबाबतही ती बिनधास्तपणे बोलते. आता माधुरी दीक्षित आणि एका कार्यक्रमाच्या आयोजकांमुळे तिचा पारा चढला आहे.
उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये तिने माधुरी दीक्षितचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं की, या कार्यक्रमाबद्दल एक विनोदी बाब म्हणजे – त्यांनी माझ्या टीममार्फत मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं, मी त्यांचं निमंत्रण स्वीकारलं, त्या दिवशीचे माझे सगळे प्लॅन्स रद्द केले, कार्यक्रमासाठी कपडे जमवले आणि शेवटच्या घडीला त्यांनी मला सांगितलं की, या कार्यक्रमासाठी आता मी निमंत्रित नाहीये. यामागचं कारण जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा मी माधुरी दीक्षितच्या गेस्ट लिस्टमध्ये नाही, असं ते म्हणाले. हे अत्यंत विचित्र कारण आहे, असं उर्फी म्हणाली
पुढे तिने लिहिलं की, मी कुठेही जाण्यासाठी उत्सुक नव्हते. पण एखाद्याला निमंत्रित केल्यानंतर ऐन वेळी त्याला ‘तू येऊ नकोस’ म्हणून सांगायचं म्हणजे…., अशी कॅप्शन तिने दिली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आयोजक आणि माधुरी दीक्षितवर टीका करत आहेत.


























































