लाचेच्या रक्कमेवरून दोन पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद

1059

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये कथित स्वरुपात लाच स्वीकारण्यावरून दोन पोलीस आपापसात भिडले. लाचेच्या रक्कमेवरून सुरू झालेला हात वाद, हाणामारीपर्यंत पोहोचला. हा सर्व प्रकार जवळच्याच सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

प्रयागराजचे पोलीस अधिक्षक (क्राईम) आशुतोष मिश्रा यांनी सांगितले की, ‘ही घटना रविवार रात्रीची आहे. दोन्ही पोलिसांना पुढील कारवाईपर्यंत निलंबित करण्यात आले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.’

32 सेकंदांचा व्हिडीओ
32 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी गाडीजवळ दिसत आहे. अचानक त्यांच्यामध्ये लाचेच्या रक्कमेवरून वाद होता. दोन्ही पोलीस एकमेकांची गचांडी पकडतात आणि पोलिसाच्या दांडक्याने मारहाण करतात. सोबत असणारे इतर पोलीस त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या