
गेल्या शतकात वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नाने मानवी आयुर्मान प्रचंड वाढले. आता पुढील पाच वर्षांत काय होईल याव्हा आढावा घेऊया.
1) अल्फाकीटोग्लुटेरेट – हे आयुष्य वाढविणारे संयुग आहे.
2) लट्ठपणा कमी करणारे औषध – लट्ठपणा आपले आयुर्मान दर दहा वर्षांपर्यंत घटवू शकते. यावर एक महत्वाचे औषध विकसित झाले आहे. हे औषध वजन घटविण्याचे काम दुप्पट वेगाने करू शकते.
3) सुपर पॉवर पेशी – हे औषध पेशींना पुन्हा संचयित करू शकते. हे पेशींच्या आजारावर उपयुक्त ठरू शकेल.
4) मास्क – केवळ मास्क वापरल्याने लाखो मृत्यू रोखले जाऊ शकतात. मास्कची क्षमता वाढविणारे संशोधन खूपच वेगाने सुरु आहे.
5) मायक्रोपेप्टाइड प्रथिने – हे प्रथिन आपला फिटनेस अनेक पटींनी वाढवू शकतो. शिवाय लट्ठपणाही रोखू शकते. याचा वापर माणसावर करण्यासाठी पुढील चार वर्षांत परवानगी मिळू शकते.
6) MRNA लस – कोरोनाच्या विरोधात या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने सुरु आहे. यामुळे शास्त्रज्ञाना प्रोस्टेट, ब्रेस्ट, कोलोरेक्टल कर्करोगाविरोधात लढण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.
7) गाडीत माद्याविरोधी तंत्रज्ञान – सर्व गाड्यांमधून हे उपकरण बसविले जाईल. यामुळे दारू प्यायलेला वाहनचालक गाडी सुरु करू शकणार नाही.
8) तरुणाईच्या रक्तात प्लास्मा आणि इतर घटक जोडून आयुर्मान वाढेल. एच आय व्हीवर उपचार. – या विषाणूचा समूळ नायनाट करता येईल.
9) शास्त्रज्ञ शरीरातील रक्तवाहिन्यांची जटील कार्यप्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात यश आल्यास प्रयोगशाळेत मूत्रपिंड, यकृत, हृदय असे अवयव विकसित करता येतील.

























































