
सामना ऑनलाईन। लखनौ
जमीनीच्या वादावरून, पैशांच्या वाटणीवरून किंवा प्रेमप्रकरणावरून सख्खी भावंड एकमेकांच्या जीवावर उठत असल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. पण उत्तर प्रदेशमध्ये लहान भावाने आपली जीन्स घातली म्हणून मोठ्या भावाने त्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.
अलाहाबाद मध्ये राहणाऱ्या या भावडांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे कळते. त्यातही मोठया भावाला कपड्यांचे वेड होते. यामुळे तो त्याचे कपडे कोणालाही घालायला द्यायचा नाही. काही दिवसांपूर्वी त्याने एक नवीन जीन्स घेतली होती. लहान भावाला ती जीन्स घालण्याचा मोह झाला. यामुळे मोठा भाऊ घराबाहेर जाताच त्याने ती जीन्स घातली.
घरी आल्यावर लहान भावाने आपली जीन्स घातल्याचे मोठ्या भावाला कळाले. यावरून दोघात कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका वाढला की दोघा भावांमध्ये हाणामारी सुरू झाली. याचदरम्यान मोठ्या भावाने लहान भावाला चाकूने भोसकले. यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला. हे बघताच मोठ्या भावाने तिथून पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
summary…up-elder-brother-killed-younger-bro-for-jeans

























































