यूपीआयचा आता 10 सेकंदात रिफंड

यूपीआय सिस्टममध्ये 16 जूनपासून मोठे बदल लागू झाले आहेत. आता यूपीआय ट्रान्झॅक्शन 66 टक्के जलद झाले आहे. तर रिफंड फक्त 10 सेकंदात मिळेल. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सहीत सर्व यूपीआय युजर्सला याचा फायदा होईल. यूपीआय सिस्टम आता अपग्रेड झाली आहे. नॅशनल पेमेट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनसीपीए) तांत्रिकी सुधार केला आहे.

आतापर्यंत ट्रान्झॅक्शन प्रक्रियेला 30 सेकंद लागायचे. ते आता 15 सेकंदात पूर्ण होईल. जर ट्रान्झॅक्शन फेल झाले तर रिफंड 10 सेकंदात होईल. रिफंडसाठी युजर्सला वाट पाहावी लागायची. मात्र आता ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद झाली आहे. ट्रान्झॅक्शनची स्थिती तपासणे, अ‍ॅड्रेस वेरिफिकेशन आणि बँक रिस्पॉन्सला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. हा बदल केवळ एका अ‍ॅपपुरता मर्यादित नाही. गुगल पे, फोन पे, पेटीएम, भिम, व्हॉट्सअ‍ॅप आणि बँकिंग यूपीआय अ‍ॅप्सवर लागू होईल.

देशभरात लाखो लोक यूपीआयने पेमेंट करतात. अनेकदा सर्व्हर डाऊन होतो. त्यामुळे युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एनपीसीआयने या समस्या लक्षात घेऊन ट्रान्झॅक्शन सुरळीत करण्यासाठी पावले उचलली आहेत.