मनोहर भोईर यांच्या प्रचारफेरीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

779

जनसामान्यांच्या नेता म्हणून ओळख असणारे उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आ.मनोहर भोईर यांच्या प्रचारफेरीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या या पाठिंब्यामुळे उरण मतदार संघावर पुन्हा भगवा फडकेल असे चित्र दिसून येत आहे.

190 उरण विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे लोकप्रिय उमेदवार आ.मनोहर भोईर यांचा झंझावाती प्रचार सुरू झाला आहे. गेल्या पाच वर्षात मतदार संघातील जनतेच्या न झालेल्या विकासकामांना गती देऊन ती पूर्णत्वास नेण्याचे कार्य आ.मनोहर भोईर यांनी केल्याने त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत.

जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारा नेता म्हणून उरण नव्हे तर रायगड जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. गेल्या पाचवर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात आ.मनोहर भोईर यांनी सुमारे 90 कोटींची विकासकामे मतदार संघात केली आहेत.त्यामुळे त्यांना गावोगावी जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.उरण मतदारसंघात त्यांची लढत शेकाप-काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीचे विवेक पाटील यांच्याशी असून भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. मात्र आ.मनोहर भोईर यांनी केलेल्या अनेक विकासकामांमुळे या दोन्हीही उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागेल असे चित्र सध्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे महिला व तरुण वर्गाच्या सक्रिय सहभागामुळे आ.मनोहर भोईर उरणचा गड कायम राखतील असा विश्वास शिवसैनिकांना वाटत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या