
सामना प्रतिनिधी । मुंबई
नेरूळ-बेलापूर ते खारकोपर मार्गाचा 12.4 कि.मी.चा पहिला टप्पा नोव्हेंबर महिन्यात सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. 12 नोव्हेंबरपासून खारकोपर ते नेरूळ-बेलापूर दरम्यान 40 लोकल फेर्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्वस्तात प्रवासाचे साधन उपलब्ध झाल्याने येथील टॅक्सी-ऑटो रिक्षा, ओला-उबरचा व परिवहन सेवेचा धंदा चांगलाच बसला आहे. परंतु उरणपर्यंत दुसर्या टप्प्याची जमीन संपादन करण्यास सिडकोला उशीर झाल्याने हा संपूर्ण मार्ग आता 2020पर्यंत पूर्ण होणार आहे.
नवी मुंबईला उरण शहराला जोडण्यासाठी नेरूळ-बेलापूर-उरण रेल्वे प्रकल्पाची संकल्पना आखण्यात आली होती. या प्रकल्पाचा खर्च मध्य रेल्वे आणि सिडकोने 33:67 च्या प्रमाणात विभागून केला आहे. प्रथम नेरूळ-बेलापूर ते खारकोपर हा 12.4 कि.मी.चा टप्पा अलीकडेच सुरू करण्यात आला असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. खारकोपर आणि नेरूळ-बेलापूर स्थानकांदरम्यान एकूण 40 सेवा चालविल्या जात आहेत. नेरूळ आणि खारकोपर स्थानक अशा 20 फेर्या तसेच बेलापूर आणि खारकोपर दरम्यान 20 फेर्या अशा एकूण दिवसभरात 40 लोकल फेर्या सध्या चालविल्या जात आहेत.
वनखात्याकडून भूसंपादन होण्यास उशीर झाल्याने ही नेरूळ-बेलापूर-सीवूड ते उरण हा 14.3 कि.मी. दुसरा टप्पा 2020 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ठळक वैशिष्ट्ये
- प्रकल्पाची एकूण लांबी – 7 कि.मी.
- प्रथम टप्पा – नेरूळ-बेलापूर ते खारकोपर- 12.4 कि.मी.
- दुसरा टप्पा (प्रलंबित)- खारकोपर ते उरण – 3 कि.मी.
- प्रकल्पाची एकूण किंमत – रु. 1,782 कोटी
…तर वाहतूक वाढेल
नेरूळ -बेलापूर ते खारकोपर हा मध्य रेल्वेचा चौथा कॉरीडॉर असून तो नोव्हेंबरमध्ये सुरू झाला असून हळूहळू या मार्गावरील वाहतूक वाढत असून दुसरा खारकोपर ते उरण हा टप्पा सुरू झाल्यावर येथील वाहतूक वाढेल असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. जैन यांनी स्पष्ट केले.
बुलेट ट्रेनसाठी अख्खे बस टर्मिनल सरकवले
- चीनमध्ये बुलेट ट्रेनचा रस्ता बनवण्यासाठी अख्खे बस टर्मिनल 90 अंशातून सरकवण्यात आले आहे. फुजैन प्रांतातील शियामेन येथील बस टर्मिनल बूलेटच्या मार्गात अडथळा ठरत होते. त्यामुळे ते पाडण्यापेक्षा सरकवण्याचे तेथील प्रशासनाने ठरवले.
- बस टर्मिनलचे वजन 30 हजार टन होते. टर्मिनलचे पाच मजले जमिनीच्यावर वर तर दोन मजले जमिनीखाली होते. त्या इमारतीची लांबी 531 फूट आणि रुंदी 11 फूट आहे. इमारतीचा एक कोपरा त्याच जागी ठेवून दुसरा कोपरा फक्त 945 फूट सरकवण्यात आला.




























































