शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिड कसे तयार होते? त्याची लक्षणे अशी ओळखा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्ली अनेकांना युरिक अॅसिडचा त्रास वारंवार जाणवतो. पण हे युरिक अॅसिड म्हणजे नेमकं काय असतं, त्याची निर्मिती कशी होते आणि त्याची लक्षणं काय असतात, याबाबत अनेकांना कमी माहिती असते.

जेव्हा काही कारणास्तव, मूत्रपिंडाचे फिल्टर कमी होते, तेव्हा यूरिक अॅसिड रुपांतरित होते, जे हाडांच्या मध्यभागी जमा होते. युरिक अॅसिड शरीराच्या पेशी आणि आपण ज्या गोष्टी खातो त्यापासून तयार होते.

यापैकी, बहुतेक युरिक अॅसिड मूत्रपिंडांद्वारे फिल्टर केले जाते, जे शरीरातून लघवीद्वारे बाहेर निघून जाते. परंतु जर युरिक अॅसिड शरीरात जास्त प्रमाणात तयार होत असेल किंवा मूत्रपिंड फिल्टर करू शकत नसेल तर रक्तातील युरिक अॅसिडची पातळी वाढते. नंतर ते हाडांच्या मध्ये जमा होते आणि त्यामुळे संधिरोगाचा त्रास होतो.

युरिक अॅसिडच्या वाढीमुळे शरीराच्या स्नायूंना सूज येते ज्यामुळे वेदना होते आणि ही वेदना शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवू शकते विशेषत: घोटे, कंबर, मान, गुडघा इत्यादी. ज्यामुळे गाऊट आणि संधिवातासारखे त्रास होऊ लागतात.

लक्षणे-

सुरुवातीला युरिक अॅसिडची वाढ लवकर आढळून येत नाही. युरिक अॅसिडची वाढ कशी ओळखावी हे बर्‍याच लोकांना माहित नसते. अशी काही लक्षणे आहेत जी आपण ओळखू शकता की युरिक अॅसिड वाढत आहे –
बसताना आणि उठताना सांध्यामधे त्रास होणे.
बोटांना सूज येणे.
पूर्ण सांधे दुखीची तक्रार.
या व्यतिरिक्त पाय आणि हातांच्या बोटांना वेदना होणे.
लवकर थकवा येणे हे देखील एक लक्षण आहे.