
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची दागिने असलेली बॅग लंडन विमानतळावरून चोरट्यांनी पळवली. लंडनच्या गॅटविक विमानतळावर ही घटना घडली. या बॅगेमध्ये 70 लाख रुपयांच्या किंमतीचे दागिने होते. उर्वशीने चोरीला गेलेली बॅग शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु, तिला अपयश आले. बॅग चोरीला गेल्यानंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांशी संपर्प केला. परंतु, कोणीच माझी मदत केली नाही, असे उर्वशीने म्हटले.