दूध देणारी गाय करतेय स्टंट ‘एन्जॉय’, मिनिटभरातील करामतीमुळे झाली ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

जगभरात अशी लोकं आहेत ज्यांच्या चित्रविचित्र कारनाम्यांमुळे त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले आहे. मात्र फक्त माणसांचेचे नाही तर जनावरांचीही अनोख्या कारनाम्यांमुळे गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड केले आहे. एक गाय तिच्या 10 कारनाम्यांमुळे चर्चेत आली आहे.

नेब्रास्का येथील मेगन रेमन नावाच्या महिलेने प्रशिक्षण दिलेल्या गायीने 1 मिनिटात 10 स्टंट दाखवून असा विक्रम केला आहे. या विक्रमाद्वारे, ती सर्वात जास्त स्टंट दाखवणारी पहिली रेकॉर्डधारक गाय बनली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की गायीने असे काय केले की तिच्या नावावर विश्वविक्रम झाला. या गायीने एका जागेवर थआंबणे, बोलवल्यावर येणे, उडी मारणे, गोल फिरणे, खाली वाकणे, आसनावर उभी राहणे, पाय उचलणे, घंटीला स्पर्श करणे, डोकं हलवणे याचा समावेश आहे. या रेकॉर्डबाबत रेमन म्हणते की, मी त्या गाईला जेव्हा पाहिले त्यावेळीच समजले की तिच्यात काहीतरी आहे. त्यानंतर तिला ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली.

मिळालेल्य़आ माहितीनुसार, रेमन घोड्यांची प्रशिक्षक आहे आणि त्या गायीलाही अशाच प्रकारे प्रशिक्षण दिले. त्याचे उदाहरण म्हणजे गाय ते सगळं लवकर शिकली आणि त्या गोष्टीही शिकली ज्या शिकणे अशक्य होते. गिनीज अधिकाऱ्यांशी बोलताना रेमेनने सांगितले की, वर्ल्ड रेकॉर्डची कल्पना एका डुकराला पाहून आळी. रेमेनने मीडियाशी बोलताना सांगितले की,रीमनने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, परफॉर्मन्सदरम्यान घोस्ट थोडा घाबरला होता. पण मला खूप आनंद आहे की त्याने दिलेल्या वेळेत जे काही करायला सांगितले होते ते केले.