एच1बी व्हिसा नियमांमध्ये बदल, हिंदुस्थानींच्या नोकऱ्या संकटात; ट्रम्प यांचा आणखी एक दणका

अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने एच1बी व्हिसा नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे हजारो हिंदुस्थानींच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. अमेरिकेत काम करणाऱ्या विदेशी कामगारांना त्यांच्या रोजगार अधिपृततेचे नूतनीकरण वेळेवर करावे लागेल, अन्यथा त्यांना तत्काळ काम करणे थांबवावे लागेल. तसेच अमेरिकाही सोडावी लागणार आहे. हा नियम 30 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या अनेक हिंदुस्थानींनचे टेन्शन वाढले आहे. नवीन नियमामुळे रोजगार अधिपृतता दस्तऐवज (ईएडी) चे ऑटोमेटिक एक्सटेंशन बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत असा नियम होता की, विदेशी  कामगार त्यांचे नूतनीकरण अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित असताना 540 दिवसांपर्यंत त्यांचा रोजगार सुरू ठेवू शकत होते. मात्र आता असे होणार नाही. ईएडी रिन्यू झाले नाही तर ताबडतोब अमेरिकेतील काम थांबवावे लागले.

g ट्रम्प सरकारच्या या नवीन नियमामुळे हिंदुस्थानींच्या नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा अमेरिकन स्थलांतरित कामगारांचा मोठा भाग असलेल्या आणि आधीच व्हिसा-संबंधित समस्यांमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

g अमेरिकेने नियम आणखी कडक केले आहेत. आता विदेशी कामगारांना प्रत्येक वेळी वेळेआधीच नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.