
अमेरिकेतील कायदे, नियमांचे काटेकोर पालन करा. यात थोडी जरी चूक झाली तरी व्हिसा रद्द करून तुमची हकालपट्टी केली जाऊ शकते. हिंदुस्थानात परत पाठविले जाईल, असा थेट इशारा अमेरिकेने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना दिला आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट करत ही धमकी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या हजारो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





























































