
अमेरिकन नौदलाने दादागिरी करून हिंदुस्थानच्या समुद्र हद्दीत घुसून लक्षद्वीपजवळ युद्धनौकेने सराव केल्याचे उघड झाले आहे. यासाठी आम्हाला पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही, अशी धक्कादायक भुमिका अमेरिकेने घेतली आहे.
अमेरिकेबरोबरच्या मैत्रीचे गोडवे गाईले जात असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 7 एप्रिलला अमेरिकेची युद्धनौका युएसएस जॉन पॉल जोन्सने हिंदुस्थानची परवानगी न घेता लक्षद्वीपपासून 130 समुद्र मैल अंतरावर सराव केला. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून सराव केला गेला. ही युद्धनौका मिसाईल भेदी आहे. एकाप्रकारे अमेरिकेने केलेली ही दादागिरी आहे.






























































