चीनचे फुजियान समुद्रात उतरले, अमेरिका चिंतेत

चीनने आपली तिसरी आणि आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली विमानवाहक युद्धनौका फुजियानला समुद्रात उतरवले आहे. फुजियानला लवकरच सेवेत उतरवले जाणार आहे. चीनच्या फुजियानमुळे अमेरिकन सैन्याच्या पॉवरला थेट आव्हान मिळणार आहे, तर हिंद महासागर आणि आशिया प्रांतातील हिंदुस्थानसह अन्य शेजारी राष्ट्रांची चिंता वाढणार आहे.

फुजियानला शांघायच्या जियांगन शिपयार्डमधून बाहेर पडताना पाहिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून याचे मेंटेनन्स चालू होते. आता चाचणी झाल्यानंतर ते थेट नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील. फुजियानला 18 सप्टेंबर 2025 ला ताफ्यात समावेश केले जाऊ शकते किंवा ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून याला सहभागी करून घेतले जाऊ शकते.

या विमानवाहक युद्धनौकेवर जे 351 स्टील्थ फायटर, जे 15 टी फायटर जेट, जे 15 डीटी इलेक्ट्रॉनिक वारफेयर प्लेन, केजे 600 विमान तैनात केले जातील. याची लांबी 320 मीटर, रुंदी 78 मीटर आहे. चीनचे पहिले सुपर कॅरियर असून ते पूर्णपणे स्वदेशी टेक्नोलॉजीने बनवले आहे. चीनकडे याआधीच लियाओनिंग आणि शेडोंग असे दोन कॅरियर आहेत. फुजियान आल्यामुळे आता चीनची समुद्रातील पॉवर आणखी वाढणार आहे.