
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी संसदेत बोलताना स्वत:च्या देशाची तुलना टॉयलेट पेपरसोबत केली आहे. ”अमेरिका स्वत:च्या फायद्यासाठी इस्लामाबादचा वापर करून घेत आहे व नंतर पाकिस्तानला टॉयलेट पेपर सारखे फेकून देतेय’, असे आसिफ म्हणाले आहेत.
”1999 नंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने अमेरिकेसोबत अफगाणिस्तानविरोधात काम सुरू केले आहे. त्याचा आपल्याच देशावर परिणाम होणार आहे. अमेरिकेला या बाबतीत पाठिंबा देण्याचे गंभीर परिणाम भविष्यात आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. अमेरिका आपला टॉयलेट पेपर सारखा वापर करून आपल्याला फेकून देणार”, असे आसिफ म्हणाले.



























































