तो ‘पुन्हा’ येतोय, रनिंग किंग उसेन बोल्टकडून संकेत

473

रेसिंग ट्रॅकचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा जमैकाचा युसेन बोल्ट पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आश्चर्य वाटलं ना… पण दस्तुरखुद्द युसेन बोल्ट याने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. ऍथलीट म्हणून निवृत्त झालेला महान धावपटू यावेळी म्हणाला, निवृत्ती मागे घेत पुन्हा रेसिंग ट्रॅकवर उतर, असे माझे प्रशिक्षक ग्लेन मिल्स मला म्हणाले, त्यानंतरच हे शक्य आहे.

उसेन बोल्टने 100 व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत विक्रम नोंदवले आहेत. एवढेच नव्हे तर आठ वेळा तो ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. मात्र सध्या तरी त्याला पुन्हा रेसिंग ट्रॅकवर उतरायचे नाही. पण एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखती तो म्हणालाय, माझ्या कोचवर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त त्यांच्या सांगण्याकरूनच मी पुन्हा रेसिंग ट्रॅककर उतरीन. अन्यथा यापासून दूरच राहीन.

आपली प्रतिक्रिया द्या