किचनमधील भांड्यांना मांसांहारी पदार्थांचा वास येत असल्यास या टिप्स वापरा

आपल्याकडे बहुतांशी घरांमध्ये मासांहार हा केला जातो. मासांहार शिजवल्यानंतर अनेकदा भांड्यांना तसाच वास राहतो. अनेकदा तर भांडी धुतल्यानंतरही हा वास कायम राहतो. बरेच लोक हा वास दूर करण्यासाठी सुगंधित डिशवॉशिंग लिक्विड वापरतात, परंतु तरीही, अंडी आणि मांसाचा वास दूर होत नाही. अशावेळी काही टिप्सचा अवलंब करणे सर्वात उत्तम.

हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे मासांहार शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी घरातील इतर भांड्यांपासून वेगळी ठेवावी.

तुम्ही ज्या भांड्यांमध्ये मासांहार शिजवला असेल, अशी भांडी लगेच गरम पाण्यात भिजवा. गरम पाण्यात भांडी ठेवल्यामुळे, भांड्यावरील डाग तर दूर होतातच, शिवाय तेलकट थरही लवकर निघतो आणि वासही येत नाही.

मासांहाराची भांडी फार काळ ठेवू नयेत. ही भांडी शक्य तितक्या लवकर धुवावी.

टोमॅटोचा वापर करा आणि सुंदर दिसा, वाचा

किचनमधील भांड्यांना नॉनव्हेजचा वास येत असेल तर खालील उपाय खूप प्रभावी ठरतात:

लिंबू मीठ

भांड्यांवर थोडे मीठ टाकावे, त्यानंतर अर्ध्या लिंबाने तो भाग नीट चोळावा. 10–15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
वास लगेच कमी होतो.

व्हिनेगर (सिरका) १ कप पाण्यात २–३ टेबलस्पून व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण भांड्यात 10 मिनिटे ठेवा किंवा भांडे या द्रावणाने धुवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. नॉनव्हेजचा तीव्र वास काढण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे.

हिवाळ्यात मक्यापासुन करा या टेस्टी रेसीपी

बेकिंग सोडा – भांड्यावर बेकिंग सोडा घालून, काही मिनिटे भांडे तसेच ठेवावे. त्यानंतर भांडे स्पंजने व्यवस्थित धुवावे. वास व चिकटपणा दोन्ही निघतात.