रेल्वेच्या तिकीट बुकिंगचा सर्व्हर डाऊन

तिकीट खिडक्यांवर लागणाऱ्या भल्या मोठ्या रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने यूटीएस ऍपच्या माध्यमातून मोबाईलवर तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र यूटीएस ऍपचा सर्व्हर सकाळपासून जवळपास तीन तास डाऊन होता. त्यामुळे मोबाईलवर तिकीट काढताना प्रवाशांना स्क्रीनवर एरर दिसत होता. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांनी तिकिटांसाठी तिकीट खिडक्यांवर मोठी गर्दी केली होती.