
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिमतीला आता थेट 100 कोटींहून अधिक किमतीचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर असणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने इटलीची कंपनी लियोनार्डोचे अडवॉन्स्ड एडब्ल्यू139 हे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. हे हेलिकॉप्टर खास व्हीव्हीआयपींसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात सुरक्षित हेलिकॉप्टरपैकी एक आहे.
या हेलिकॉप्टरची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकाचवेळी 12 ते 15 लोक बसू शकतात. या हेलिकॉप्टरमध्ये डबल इंजिन दिले आहे. उड्डाण करताना एक इंजिन फेल झाल्यावरही हे हेलिकॉप्टर सुरक्षित उड्डाण करू शकते. सुरक्षा ध्यानात ठेवून यामध्ये क्रॅश सेफ्टी सिस्टम, बुलेटप्रूफ बॉडी, डिजिटल ग्लास कॉकपिट, साउंडप्रूफ केबिन दिले आहे. हे हेलिकॉप्टर धुक्यात, पावसात आणि अंधारात सुद्धा उड्डाण करण्यात सक्षम आहे. या हेलिकॉप्टरचा वेग जास्तीत जास्त प्रति तास 278 किलोमीटरपर्यंत आहे. या हेलिकॉप्टरला उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि सुरक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी खरेदी केले आहे. या हेलिकॉप्टरच्या काही व्हेरियंट्समध्ये हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे. तसेच आवश्यकता पडल्यास मशीन गन फिट केली जाऊ शकते. सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे.




























































