
यूपीतल्या जलालपूर येथे एका डॉक्टरची हत्या करून पसार झालेला सराईत गुंड वांद्रय़ात एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ सापडला. यूपीत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, हत्यार बाळगणे, दंगल घडवणे अशा गुह्यांची नोंद दया नायक व पथकाने पकडलेल्या मंगेशकुमार यादव (22) याच्यावर आहे.
वांद्रे येथील रंगशारदा परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीर शस्त्रs घेऊन येणार असल्याची खबर युनीट-9ला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दया नायक, निरीक्षक सचिन पुराणिक, दीपक पवार, सपोनि महेंद्र पाटील व पथकाने रंगशारदा येथील अॅप्को पंन्स्ट्रक्शन साईटवर सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार मंगेशकुमार यादव याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत यूपीतल्या जलालपूर येथील एका डॉक्टरची हत्या करून पसार झाल्याची कबुली त्याने दिली.
बँक कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल
शासनाच्या स्टॅम्प डय़ुटीचे शुल्क भरल्याचे बनावट चलन लावून आणि कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने एका खासगी बँकेच्या दहा कर्मचाऱयावर वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आठ कर्मचाऱयाने ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.



























































