धक्कादायक! पत्नीसह तीन मुलांची हत्या करुन पतीने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जौनपुरच्या मडियाहू परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील जयरामपुर गावात आज सकाळी एकाच कुटुंबातील पाच लोकांचे मृतदेह सापडले. पतीने पत्नीची हत्या करुन त्यानंतर तीन मुलांची हत्या करुन त्यानंतर त्या व्यक्तीने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

जयरामपूर गावातील नागेश विश्वकर्मा याचा बुधवारी सकाळी काही कारणाने वाद झाला. वाद इतका वाढला की पत्नी राधिका (35) हिला मारहाण करुन तिची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने आपल्या तीन मुलांनाही सोडले नाही. मोठी मुलगी निकिता, मुलगा आदर्श आणि तीन वर्षीय मुलगी आयुषीची हत्या केल्यानंतर आरोपी नागेश (37) ने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी 10 वाजले तरी घराचा दरवाजा बंद असल्याने शेजारी राहणाऱ्या चुलत भाऊ सोनू विश्वकर्मा यांनी डायल 112 पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलीसांनी घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी समोरील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. घराच्या आत एकाच बेडवर तीन मुलांचे मृतदेह ठेवण्यात आले. तर जवळच पत्नी राधिकाचा मृतदेह सापडला. पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मुलांचा गळा कपड्याने दाबला होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसपी अजय पाल शर्मा यांनी घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगितले. फॉ़रेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून तपास करत आहे. सर्व मृतदेहांना ताब्यात घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. एकाच घरातील पाच लोकांच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. संपूर्ण गाव शोकाकूळ झाला आहे. मात्र या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले आहे. अपर पोलीस अधीक्षक ग्रामीण शैलेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, नागेश विश्वकर्मा यांनी पत्नी आणि तीन मुलांची हत्या करुन स्वत: फाशी लावून आत्महत्या केली.