उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, 25 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एक प्रवासी बस आणि जेसीबी लोडरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त व्यक्त केला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कानपूरमध्ये एका कॅनॉल शेजारील रस्त्यावर खासगी बस आणि जेसीबी लोडरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात 17 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघात 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याकडून मदतीची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.

तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवईकांना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना सर्वतोपरी मदत देण्याचे आदेश दिले आहेत.