भावाची चूक बहिणीला महागात पडली, आई-वडिलांसमोर केले घृणास्पद कृत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rape
प्रातिनिधिक फोटो

उत्तरप्रदेशात अल्पवयीन मुलीवर तिच्या आई-वडिलांसमोर सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. सूडभावनेतून हे कृत्य केले असून याप्रकरणी सातजणांसह एका अज्ञाताला अटक करण्यात आले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा भाऊ 27 जून रोजी घराशेजारी राहणाऱ्या प्रेयसीसोबत फरार झाला होता. मात्र बराच शोध घेऊनही ते दोघं न सापडल्याने मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांना धडा शिकवण्यासाठी कट रचला. त्यांनी 28 जून रोजी मुलाच्या आई-वडिलांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना अमरोहा येथील नातेवाईकांच्या घरी नेऊन ओलीस ठेवले. तेथून आईच्या फोनवरून त्यांच्या अल्पवयीन मुलीला फोन लावून अमरोहाला बोलावून घेतले. घटनास्थळी ती पोहोचली असता तिच्या आईवडिलांसमोरच तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हतबल आईवडिल आरोपींसमोर रडत होते, विनवण्या करत होते. मात्र नराधम सूडाने पेटले होते. त्यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. ते तिच्यावर अत्याचार करत राहिले.

एवढेच नाही तर नराधमांनी अनेक दिवस तिला ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटून मुलीसह आई-वडिलांनी छजलट पोलीस स्थानक गाठले. पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत मुलासह फरार झालेल्या मुलीचे वडिल, काकाने आणि भावांनी मिळून मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. बऱ्याच विनवण्या करुनही ते नराधम ऐकले नाहीत, त्यांच्या डोक्यात फक्त सूडाची भावना होती. नराधम सारखे हेच बोलत होते तुमचा मुलगा आमच्या घरची अब्रू घेऊन गेला आहे. आम्ही तुम्हालाही कोणासमोर तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा घटना पोलीस स्थानकापर्यंत पोहोचली त्यावेळी आरोपींनी त्यांच्या मुलाशी पीडितेचे बळजबरीने लग्न लावून दिले. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 डी, पोक्सो कायदा, आयपीसीच्या कलम 342, 354, 506 नुसार 7 आरोपींसह एका अज्ञान आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.